रामदास कदम यांची माघार : “बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, त्यांच्या बदनामीसाठी मी काही बोलणार नाही

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 रामदास कदम यांची माघार : “बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, त्यांच्या बदनामीसाठी मी काही बोलणार नाही

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर माघार घेतली आहे.
कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य मला करायचे नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी मला सांगितले होते की हाताचे ठसे घेतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेले आहेत. तसेच आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले असतील तर त्यात वाईट काय?”

रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “परंतु अनिल परब यांना असे वाटते की मी स्वीस बँकेसाठी ते बोललो आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कदापि येणार नाहीत. मी फक्त संशय व्यक्त केला होता. संपला विषय माझा.”

शेवटी कदम म्हणाले, “बाळासाहेबांची बदनामी होईल, असे कुठलेही वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. आमचे ते दैवत आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी वादावर पूर्णविराम दिला.

 

 


#MH25News #RamdasKadam #BalasahebThackeray #ShivsenaUBT #Shivsena #MaharashtraPolitics #LatestNews

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]