मी अविश्वास ठराव जिंकलो – सरपंच अतुल लांजेकर यांची स्पष्टॊक्ती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मी अविश्वास ठराव जिंकलो – सरपंच अतुल लांजेकर यांची स्पष्टॊक्ती

आबलोली (संदेश कदम)
एक महिना झाला माझ्यावर माझे विरोधक आरोप – प्रत्यारोप करीत होते. आणि त्यांनी आमचे सदस्य फोडले व अविश्वास ठराव दाखल केला. सगळीकडे त्यांनी बोंबाबोंब चालू केली होती. आणि आमच्या सदस्यांना कोणती ही कल्पना नसताना ते तिथे घेऊन जाऊन अविश्वास ठरावावर, प्रस्तावावर सह्या घेतल्या होत्या पण जेव्हा अविश्वास ठरावाची बैठक झाली. सहा तारखेला त्याची सभा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली. तेव्हा अविश्वास ठराव, विश्वास दर्शक करून मी पूर्णपणे जिंकलो आहे.
अशी स्पष्टोक्ती पत्रकार परिषदेत बोलताना गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायत येथे पत्रकार परिषदेत सरपंच अतुल लांजेकर बोलत होते. अविश्वास ठराव तुमच्या विरोधात दाखल झाला होता. त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सरपंच अतुल लांजेकर म्हणाले की, मी अविश्वास ठराव जिंकलो यामध्ये माझ्या सदस्यांनी ठामपणे सांगितले की, आमच्या सरपंचांनी जी – जी विकास कामे केलेली आहेत. ती सर्व आम्हाला पूर्णपणे माहिती आहेत. आमचा सरपंचांवर पूर्णपणे विश्वास आहे.असे तिथे सांगितले म्हणून मी अविश्वास ठराव पूर्णपणे जिंकलो आहे. आणि विरोधकांनी जे माझ्यावर आरोप केलेले आहेत. ते सर्व आरोप निष्फळ ठरले आहेत. आणि मी निष्पाप पणे यातून बाहेर पडलो आहे आणि यापुढे कुणालाही कोणतीही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीला अर्ज करून माहिती घ्यावी. आमचे सगळ्यांचे हेच म्हणणे होते की, तुम्हीं ग्रामपंचायतीची आधी चौकशी करा आणि नंतर आरोप करा. आणि सगळ्या माझ्या सदस्यांना, गावकऱ्यांनाही मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की, त्यांनी मला ग्रामपंचायतीत विश्वासाने काम करण्याची संधी दिलीत. त्याबद्दल मी माझ्या गावकऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो अशी स्पष्टॊक्ती पत्रकार परिषदेत झोंबडी ग्रामपंचायतचे सरपंच अतुल लांजेकर यांनी बोलताना दीली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]