आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे पाणलोट विकास व जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे पाणलोट विकास व जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ

आबलोली (संदेश कदम )
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 प्रकल्प स्तरावरील ग्रामस्तरीय प्रशिक्षण सारांश राष्ट्रीय युवा स्वयंरोजगार विकास संस्था रत्नागिरी, क्लस्टर क्रमांक 5, तालुका गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात पाणलोट विकास व जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन करण्यात आलेले आहे.या पाणलोट विकास व जाणीव जागृती प्रशिक्षणाचा शुभारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विचार मंचावर आबलोली ग्रामपंचायत सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, आनंदवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष दत्ताराम कदम, माझी वसुंधरा योजनेच्या मास्टर ट्रेनर सुनिता गांधी, माजी सभापती पूर्वीताई निमूणकर, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, उमेश पवार, शैला पालशेतकर, पाणलोट सचिव नितेश पांचाळ,बचत गटाच्या सीआरपी. मीनल कदम, वेदिका पालशेतकर, पूजा कारेकर,पाणलोट पथक प्रमुख आदित्य कदम, तज्ञ आरती धनावडे, समीरराज सावंत, राजू सोलगे, रोहिणी जाधव,दीपेश आंबेकर, विजय वैद्य, रमेश नेटके,महेंद्र कदम, कृष्णा पाळशेतकर आदी. उपस्थित होते. या प्रशिक्षणात आबलोली गावातील बचत गटाच्या महिला, शेतकरी बंधू, बहूसंख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, पंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, माझी वसुंधरा मास्टर ट्रेनर सुनिता गांधी यांनी मौलिक मार्गदर्शन केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणलोट सचिव नितेश पांचाळ यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]