वीज कामगारांची दिवाळी अंधारात जाणार नाही : राजेंद्र पवार

 

🔌 वीज कामगारांची दिवाळी अंधारात जाणार नाही : राजेंद्र पवार

महावितरण संचालकांची हमी — कोणताही कंत्राटी कामगार कमी होणार नाही; दिवाळीपूर्वी वेतन, फरक आणि बोनस देण्याचे निर्देश

 

मुंबई — महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक 16 ऑक्टोबर रोजी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वीज कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. पुनर्रचनेच्या प्रक्रियेमुळे कोणताही कंत्राटी कामगार कमी होणार नाही, उलट 10 टक्के अधिक कामगार वाढवले जाणार असल्याची ग्वाही राजेंद्र पवार यांनी संघटनेला दिली.

 

कोर्टाने संरक्षण दिलेल्या कंत्राटी कामगारांच्या याद्या राज्यातील सर्व विभागांना पुन्हा पाठवल्या जाणार आहेत. कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील आणि नवीन आलेल्यांपेक्षा जुने कामगार प्राधान्याने कायम ठेवले जातील, अशी माहिती मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी दिली.

 

संघटनेने दिवाळीपूर्वी वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावर प्रतिसाद देताना संचालक राजेंद्र पवार यांनी चालू आणि थकीत वेतन, मागील फरक आणि बोनसची रक्कम तातडीने देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

 

बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार आणि निखिल टेकवडे उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित विषयांवर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.


हॅशटॅग्स:

#महावितरण #वीजकामगार #राजेंद्रपवार #महाराष्ट्र #दिवाळी2025 #Mahavitaran #ContractWorkers #RatnagiriVartahar

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें