शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प) विधानसभेतर्फे दिवाळी निमित्त विभागात पणती वितरण उपक्रमाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प) विधानसभेतर्फे दिवाळी निमित्त विभागात पणती वितरण उपक्रमाचे आयोजन

मुंबई – संदीप शेमणकर
दिवाळी सणाचे औचित्य साधून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी पणती वितरण उपक्रमाचे आयोजन
घाटकोपर (पश्चिम ) विधानसभेच्या वतीने करण्यात आले.शिवसेना नेते, सचिव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल भाऊ देसाई यांच्या शुभहस्ते शिवसेनाभवन येथे दिवाळी निमित्य पणती वाटपाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव अशोक शेंडे, सचिव निखिल सावंत, खजिनदार देविदास माडये, कार्यकारिणी सदस्य बबन सकपाळ उपसंघटक विजय पवार,उपस्थित होते. सदर उपक्रमाचे आयोजन कक्ष विधानसभा संघटक यशवंत खोपकर यांच्या प्रयत्नातून करण्यात आले. असून या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.यावेळी , कक्ष उपसंघटक राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक संतोष चादे,आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]