जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा

highlits

📰 जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून माजी सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा

माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पित्यांच्या सेवेसाठी रत्नागिरीत विविध ठिकाणी शिबिरे; आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

 

रत्नागिरी – माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता-पिता यांच्या विविध शासकीय कामकाज आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत नोव्हेंबर महिन्यात विशेष कल्याण संघटक दौरा आयोजित करण्यात आला आहे.

 

या दौऱ्यादरम्यान सेना अभिलेख कार्यालय संबंधित कामे, पेन्शन विषयक मार्गदर्शन, महासैनिक पोर्टलवर नोंदणी, तसेच इतर अनुषंगिक प्रश्नांची उकल केली जाणार आहे. यासाठी संबंधितांनी पुढील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:

डीस्चार्ज बुक, पीपीओची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ई.सी.एच.एस. कार्ड तसेच आधारशी लिंक असलेला मोबाईल फोन.

 

📍 दौऱ्याचे वेळापत्रक:

✅ चिपळूण तालुका – सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण

➡ ४, ११, १८ आणि २५ नोव्हेंबर

 

✅ खेड – सैनिक मुलांचे वसतिगृह, खेड

➡ ३, १०, १७ आणि २४ नोव्हेंबर

 

✅ मंडणगड – भोसले प्लाझा

➡ ६ नोव्हेंबर

 

अधिक माहितीसाठी कल्याण संघटकांचे संपर्क क्रमांक:

📞 अनिल मोरबाळे – 7218498627

📞 राहुल काटे – 8210252830

📞 सुनील कदम – 9413541588

 

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी सर्व पात्र माजी सैनिक व कुटुंबीयांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 

 

 

 

 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें