रोटरी क्लब रत्नागिरी’तर्फे टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा संपन्न

रोटरी क्लब रत्नागिरी’तर्फे टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा संपन्न

 

केतन चौधरी यांना शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासाठी सन्मान

 

रत्नागिरी : गेल्या ६८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या रोटरी क्लब रत्नागिरीतर्फे यंदाचा टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड सोहळा हॉटेल विवेक येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

 

रत्नागिरीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव (रत्नागिरी) येथे गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेले केतन चौधरी यांना शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

 

प्रांतपाल डिकोस्टा यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. या वेळी रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव विरकर, तसेच वरिष्ठ रोटरीयन दिलीप भाटकर आणि धरमसी चौहान उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन माधुरी कळंबटे आणि वेदा मुकादम यांनी केले.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें