प्रचारासाठी वाहनांवर झेंडे–फलक लावण्यास निर्बंध

🚫 प्रचारासाठी वाहनांवर झेंडे–फलक लावण्यास निर्बंध

VOTER ID

रत्नागिरी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025 साठी राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील झेंडे आणि प्रचारफलकांवर निर्बंध लागू केले आहेत.

निर्बंध पुढीलप्रमाणे :

1. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवरील पक्ष झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस, विंडस्क्रीनच्या पुढे नसावा आणि टपापासून दोन फूटांपेक्षा जास्त उंच नसावा.

2. प्रचाराचे कापडी फलक वाहनचालकाच्या आसनाच्या मागे, वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूसच लावता येतील. इतर बाजूंना ते लावण्यास मनाई आहे.

3. झेंडे किंवा फलक लावलेले वाहन हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेले असावे. इतर कोणत्याही वाहनांवर ते लावता येणार नाहीत.

हे आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 नुसार लागू करण्यात आले असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

पोलीस विभागाने हे आदेश ध्वनीक्षेपकाद्वारे जाहीर करून नागरिकांना त्याची माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें