गुहागर नगरपंचायत निवडणूकीत सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा..!

गुहागर नगरपंचायत निवडणूकीत सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा..!

आबलोली (संदेश कदम )

गुहागर येथील नगरपंचायत निवडणूकीत गुहागर शहरात रंगत येणार असून गेली दहा वर्ष गुहागर तालुक्यातील महिलांचे सबलीकरण तसेच महिलांना व्यवसाय,उद्योग व नोकरी देणाऱ्या सामाजिक महिला कार्यकर्त्या आणि डॅशिंग उच्चशिक्षित सर्व समावेशक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या सौ. पारिजात कांबळे यांच्या नावाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. बाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी थेट संवाद साधला असता सौ.पारिजात कांबळे म्हणाले की, मी ओरिजनल शिवसेनेची पदाधिकारी आहे. पक्ष जो आदेश देईल तो आदेश मला मान्य राहील. जनतेने स्वीकारणे व निवडून देणे हे त्यांचे काम आहे. पक्षाने मला संधी दिली तर सर्वांना सोबत घेऊन गुहागर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.या आधीही नगरसेविका पदाची निवडणूक मी लढवली होती.मात्र अवघ्या दोन मताने पराभव झाला. आत्ता महिला नगराध्यक्ष पदाची संधी आहे जनतेने मनापासून कौल दिला तर शहराचा विकासात्मक कायापालट नक्कीच करेन व सर्व समावेशक कार्य करेन असा विश्वासही सौ.पारिजात कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. सामाजिक, धार्मिक कार्यात व सर्वसामान्य जनतेला अहोरात्र मेहनत घेऊन मदत करणाऱ्या सौ पारिजात कांबळे यांना उमेदवारी पक्षाकडून संधी मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें