डॉ. जीवन आर. राजगुरूंना सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते फार्मसी संशोधन आणि शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

डॉ. जीवन आर. राजगुरूंना सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते फार्मसी संशोधन आणि शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

पुणे : रॅडिसन ब्लू हॉटेल येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित ‘हेल्थकेअर एक्सलन्स अँड लीडरशिप अवॉर्ड २०२५’ या भव्य समारंभात डॉ. जीवन आर. राजगुरू यांना “फार्मसी संशोधन आणि शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी सर्वोत्कृष्ट प्राचार्य” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ही गौरवशाली कामगिरी Insight Success आणि Insight Business Journal यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पार पडली. या पुरस्काराद्वारे आरोग्य आणि फार्मसी क्षेत्रातील संशोधन, शिक्षण तसेच नेतृत्व या क्षेत्रांत डॉ. जीवन आर. राजगुरू यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला.

डॉ. जीवन आर. राजगुरू हे सध्या डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, भोरवाडी, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

🏆 डॉ. जीवन आर. राजगुरू यांना या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

 

बातमी ~नंदकुमार बागडेपाटील 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें