नशा मुक्त भारत’ अभियानांतर्गत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ.

नशा मुक्त भारत’ अभियानांतर्गत तळवली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ.

गुहागर :(मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि.रत्नागिरी या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत या अभियानांतर्गत शपथ घेतली.
जि. प. शिक्षण विभाग व समाज कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या आदेशानुसार आज दि.18/11/2025 रोजी प्रशालेतील इयत्ता 5 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत करण्याची शपथ घेतली.इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी कु.आयुषी डाकवे हिने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुळे सर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.यावेळी मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर यांनी ‘नशा मुक्त भारत’ अभियानाचे महत्त्व सांगुन आजचा तरुण नशेच्या आहारी कसा जातोय व त्यामुळे त्याचे स्वत:चे, कुटंबाचे, समाजाचे नुकसान कसे होते. हे सांगुन त्या पासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. नशा पान करणार नाही, त्याच्या आहारी जाणार नाही… आणि इतरांनाही नशेच्या आहारी जाऊ देणार नाही असा संकल्प केला पाहिजे. असे आवाहन केले.

या कार्यक्रमास प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर, श्री. केळस्कर सर, श्री. गवळी सर, श्री बागल सर, श्री. गुरसळे सर, श्री. कुळे सर. सौ.नाईक मॅडम, सौ.कांबळे मॅडम, श्री.कदम सर, अक्षय चव्हाण,प्रणय आरोलकर इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
*प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी यावेळी नशेच्या आहारी गेल्यामुळे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे स्पष्ट करुन सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें