मंडणगड तालुक्यात बाणकोट (उमरोली) जि.प. गटात राष्ट्रवादी व उबाठा गटाला खिंडार

मंडणगड तालुक्यात बाणकोट (उमरोली) जि.प. गटात राष्ट्रवादी व उबाठा गटाला खिंडार

मंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन शेकडोंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील बाणकोट (उमरोली) जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. मंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणाली व लोकाभिमुख शैलीवर प्रभावित होऊन बाणकोट जि.प. गटातील मौजे वेरळ, गोठे, केरीळ, चिंचघर, गाठवण येथील संपूर्ण ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने मुंबईतील ग्रामस्थांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

हा पक्षप्रवेश सोहळा मंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. मंत्री महोदयांनी सर्व नव्या कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शिवसेनेच्या झेंड्याखाली काम करण्याचे आवाहन केले.

 

सदर कार्यक्रमास शिवसेना दापोली विधानसभा संपर्कप्रमुख श्री. सुधीर कदम, सहसंपर्कप्रमुख (रत्नागिरी जिल्हा) श्री. आदेश केणे, मुंबई–मंडणगड तालुका संपर्कप्रमुख श्री. शंकर बांद्रे, मंडणगड तालुका प्रमुख श्री. प्रतापदादा घोसाळकर, मुंबई तालुका संघटक श्री. तुकाराम गायकवाड, मंडणगड तालुका समन्वयक श्री. अनिल रटाटे, मुंबई–मंडणगड तालुका सचिव श्री. विश्वास शिंदे, उपतालुका प्रमुख श्री. संजीव येसावरे, श्री. हरिश्चंद्र कोदेरे, देव्हारे गण विभाग प्रमुख श्री. संजय शेडगे, उमरोली गण विभाग प्रमुख श्री. आनंद भाटे, देव्हारे विभाग संघटक श्री. निलेश रक्ते, मुंबई विभाग संघटक श्री. अजय शिगवण, उमरोली गण उपविभाग संघटक श्री. शैलेश नागले, उद्योजक श्री. संदेश चिले, शिवसेना सचिव श्री. सिद्धेश देशपांडे, युवासेना जिल्हा सचिव विनय काते, युवासेना तालुका संघटक श्री. विकास पवार, उपतालुकाधिकारी श्री. देविचंद गणवे, उपतालुका संघटक श्री. कल्पेश पाडावे, श्री. सागर कदम, श्री. दिपेश शेलार, श्री. मनोज रक्ते, श्री. विशाल येसरे, श्री. रुपेश म्हाप्रळकर, युवासेना सहसचिव श्री. सतिष सोंडकर, श्री. सुनील सावंत, श्री. संदीप येलवे, श्री. सुरज घोसाळकर तसेच शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या जाहीर पक्षप्रवेशामुळे बाणकोट (उमरोली) जि.प. गटातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये निर्णायक बदल होणार असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें