अंजनवेल केंद्राची शिक्षण परिषद वेलदूर नंबर १ शाळेमध्ये संपन्न

अंजनवेल केंद्राची शिक्षण परिषद वेलदूर नंबर १ शाळेमध्ये संपन्न

गुहागर ~ वार्ताहर 
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिकWt शाळा , वेलदूर नंबर एक येथे अंजनवेल केंद्राची शिक्षण परिषद अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली.शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सौ आरोही शिगवण मॅडम या होत्या.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती वेलदूर नंबर एक च्या अध्यक्ष वैभवी जांभारकर ,वेलदूर घरटवाढीचे मुख्याध्यापक रमेश शिंदे, वेलदूर नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम नांदगावकर ,वेलदूर नवानगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, रानवी शाळेचे मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, अंजनवेल नंबर दोन शाळेच्या इन्चार्ज मुख्याध्यापिका सुकन्या खामकर, केंद्रातील सर्व पदवीधर शिक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते.वेलदूर नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर असा परिपाठ सादर केला.उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम नांदगावकर यांनी स्वागत केले .त्यावेळी निपुण महाराष्ट्र याविषयी सुकन्या पावरी मॅडम ,विद्यांजली पोर्टल बाबत रमेश शिंदे सर ,ताण तणाव व्यवस्थापन बाबत अनिल राजे शिंदे सर ,नाविन्यपूर्ण उपक्रम मांडणी याबाबत डॉ मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले .अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम म्हणाल्या की वेलदूर नंबर एक शाळेने शिक्षण परिषदेचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन केले आहे, त्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांचे त्यांनी अभिनंदन केले.दिवसभर शिक्षण परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या सर्व विषयांचा त्यांनी आढावा घेतला.तसेच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे त्यांनी नियोजन केले तसेच शिक्षक स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल प्रभू हंबर्डे ,अवधूत राऊतराव व मानसी जोशी मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक गणेश विचारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रभू हंबर्डे यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें