डॉ. निजामी मुस्ताक अहमद यांना राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ पुरस्कार

डॉ. निजामी मुस्ताक अहमद यांना राज्यस्तरीय ‘आरोग्यदूत’ पुरस्कार

श्रीरामपूर : नंदकुमार बागडेपाटील

येथील डॉ. निजामी मुस्ताक अहमद यांना राज्यस्तरीय ‘आरोग्य दूत’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोरोना काळात त्यांनी गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार, रुग्णसेवा आणि सतत मार्गदर्शन करून मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक व आरोग्य सेवेला लक्षात घेऊन त्यांना आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

भारतीय लहुजी सेनाच्या वतीने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब बागुल यांनी पत्रकाद्वारे दिली.

या कार्यक्रमाला भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, महाराष्ट्र राज्याचे विधी सल्लागार ॲड. रमेश कोळेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें