पदाचा गैरवापर करून स्वतःच्या नावावर बनावट सात बारा उतारा तयार करून खरेदी दस्त नोंदवण्याच्या गुन्ह्यातून तलाठी महिलेची निर्दोष मुक्तता.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचा गैरवापर करून स्वतःच्या नावावर बनावट सात बारा उतारा तयार करून खरेदी दस्त नोंदवण्याच्या गुन्ह्यातून तलाठी महिलेची निर्दोष मुक्तता.

( ॲड. संकेत साळवी यांची प्रभावी मांडणी यशस्वी )

गुहागर ~ स्वतः तलाठी आल्याचा गैरफायदा घेऊन शेतकरी आहे असे भासवण्यासाठी खोटा सात बारा उतारा तयार करून आणि तो उतारा दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खता साठी वापरल्याच्या गुन्ह्यातून काल गुहागर न्यायालयाने स्वेजल पोलादे या तलाठी महिलेची निर्दोष मुक्तता केली. ही घटना सन २०१७ सालामध्ये गुहागर येथे घडली होती. सुमारे ७ वर्ष हा खटला गुहागर न्यायालयात सुरू होता. सरकारी कर्मचाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केले असल्याने सामान्य नागरिकांसोबतच शासकीय अधिकाऱ्यांचे देखील या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुहागर तालुक्यातील माळन या गावच्या तलाठी म्हणून स्वेजल पोलादे या काम पाहत होत्या त्यावेळी त्यांच्याकडे पोमेंडी या गावाचा देखील अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
पोलादे यांना त्यांच्या मैत्रिणी सोबत पोमेंडी या ठिकाणी एक शेतजमीन खरेदी करायची होती. शेत जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक होते. त्यांच्या मैत्रिणीकडे शेतकरी दाखला होता परंतु पोलादे यांच्या नावाने अगर त्यांच्या वडिलांच्या नावाने शेतजमीन नसल्याने त्याना शेतकरी दाखला मिळत नव्हता. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या नावावर सदर जमिनीचे खरेदी खत नोंदवले. पोलादे यांनी त्या खरेदीखतामध्ये स्वतःच्या नावावर बनावट सात बारा उतारा तयार करून जोडला आहे अशा आशयाची एक तक्रार तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली होती. त्या आधारे महसूल विभागाने चौकशी केली असता त्यामध्ये तलाठी पोलादे यांनी स्वतः शेतकरी असल्याचे भासवण्यासाठी संगणकीय सात बारा उताऱ्यात फेरफार करून चिपळूण येथील एका शेतजमिनीचा सात बारा उतारा स्वतःच्या नावे करून घेतल्याचे आणि तो सात बारा उतारा खरेदीखताला जोडला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने गुहागरच्या तत्कालीन तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुहागर पोलीस ठाण्यात तलाठी महिलेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तलाठी महिलेने मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता.

गुहागर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून असंख्य कागदोपत्री पुराव्यांसह तलाठी महिलेविरुद्ध गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आरोपी महिला तलाठी स्वेजल पोलादे हिच्या वतीने निष्णात फौजदारी वकील संकेत साळवी यांनी संपूर्ण खटल्याचे कामकाज चालवले. सरकारी पक्षा मार्फत या केस मध्ये एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तहसीलदार, खरेदीखातामधील साक्षीदार, पोलिस अधिकारी आणि हस्ताक्षर तज्ञाचा अहवाल यांचा समावेश होता. आरोपी महिलेच्या वतीने ॲड. संकेत साळवी यांनी या सर्व साक्षीदारांचा उलट तपास घेतला. हस्ताक्षर तज्ञांच्या अहवालातील तांत्रिक चुका तसेच महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राथमिक चौकशीत केलेल्या चुका आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. पोलिस अधिकारांच्या उलट तपासणी मध्ये तपासकामातील दोष समोर आणण्यात ॲड.संकेत साळवी हे यशस्वी ठरले. ॲड. संकेत साळवी यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाचे पुरावे निकामी ठरवून कायद्याच्या तरतुदी प्रभावी पणे मांडल्या. न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात ॲड. संकेत साळवी यांच्या वकिली कौशल्याचे विशेष कौतुक केले आहे.

सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुहागर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल घोषित करून तलाठी स्वेजल पोलादे यांची सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]