राज्यस्तरीय आदर्श कला संघटना २०२५” या पुरस्काराने आय. झेड.कोकणातले सन्मानीत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यस्तरीय आदर्श कला संघटना २०२५” या पुरस्काराने आय. झेड.कोकणातले सन्मानीत

आबलोली (संदेश कदम)
आय. झेड.कोकणातले यांना “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि युटूब चॅनल या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कला संघटना २०२५” हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.हा पुरस्कार दिशा महाराष्ट्राची या वेब पोर्टल आणि युटूब चॅनल या संस्थेचे मुख्य संपादक तुषार गौतम नेवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलन आणि सन्मान सोहळा २०२५ या सन्मान सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मान.माला मेश्राम यांचे शुभ हस्ते आय. झेड.कोकणातले यांना “राज्यस्तरीय आदर्श कला संघटना २०२५” हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
हा पुरस्कार स्विकारताना अष्टपैलू व्यक्तीमत्व,लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेता शशांक सुर्यकांत कोंडविलकर, कलाकार मकरंद वैद्य, मंगेश जाधव, समीर कोंडविलकर, गौरव पवार, आणि आय. झेड.कोकणातले यांचे प्रसिद्धी प्रमूख पत्रकार संदेश कदम आदी. उपस्थित होते.
यावेळी कवी संमेलन आणि सन्मान सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा नवी मुंबई येथे मान.चंद्रकांत जगताप, मान. इक्बाल मुकादम, मान. भाऊसाहेब कांबळे, मान.माला मेश्राम, मान.डॉ.रोहिणी दिक्षित मान.सरकार इंगळी, मान.सुवर्णा कदम, कार्यक्रम अध्यक्षा मान.अर्चणा मोहिते आदी.दिग्गज साहित्यिक कवी मान्यवर लाभले होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सपना नेवरेकर, चंद्रसेन जाधव यांनी केले. या वेळी आय झेडचे प्रमुख शशांक कोडवीलकर यांनी सागितले कि कोकणातील गावरान बोली, ओघवती वाक्यरचना आणि हसवणूक यांचा संगम म्हणजे “आय झेड कोकणातले”. या चॅनेलची सुरुवात १० मे २०१६ रोजी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आय झेड कोकणातले हे नाव कोकणातील लोकांच्या मनात घर करून बसले आहे.
कोकणातलं पहिलं गॅग (चुटकुल्यांचं) चॅनेल म्हणून ओळख मिळवणाऱ्या आय झेड ने केवळ विनोद दिला नाही, तर त्यासोबत प्रबोधनाचं वलय देखील जपलं. हसत-खेळत माणसाला विचार करायला लावणं, हे या चॅनेलचं वैशिष्ट्य ठरलं.गुहागर तालुक्यातील अनेक कलावंतांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आपली कला सादर केली ती आय झेडच्या माध्यमातूनच. त्या आधी कला होती, पण ती फक्त रंगमंचापुरती मर्यादित होती. व्हिडिओ स्वरूपात कला मांडण्याचं धाडस आय झेड ने दाखवलं.
आज पंचक्रोशीत अनेक चॅनेल्स उभी राहिली आहेत, पण त्या सगळ्यांच्या पाठीशी प्रेरणास्थान म्हणून उभं होतं – आय झेड कोकणातले.
काळाच्या ओघात बरेच चढ-उतार आले. तरीही आय झेड ने हार मानली नाही. सामाजिक उपक्रम, स्पर्धा आयोजन, महापुरग्रस्तांना मदत – मग तो चिपळूणचा महापूर असो किंवा केरळचा, आय झेड ने नेहमी मदतीचा हात पुढे केला.
. आजही ते स्पर्धेत खंबीर उभं आहे आणि आपल्या गावरान भाषेत, साध्या मनमोकळ्या विनोदांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
“आय झेड कोकणातले” हा फक्त एक YouTube चॅनेल नाही – तो कोकणातील लोकांच्या भावना, संस्कृती आणि हसऱ्या चेहऱ्यांचा आरसा आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]