रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तळवली हायस्कूलचे सुयश

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तळवली हायस्कूलचे सुयश

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर या प्रशालेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.तनुश्री नोमेश कारेकर हिने गुहागर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मर्या.रत्नागिरी आयोजित गुहागर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुयश संपादन केल्याबद्दल कु.तनुश्री नोमेश कारेकर हिला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार सर व इतर शिक्षक वृंद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थिनीस प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. या सुयशाबद्दल प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री.कुळे सर यांनी केले होते.यावेळी जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर, श्री. देवरुखकर सर, श्री.केळस्कर सर ,श्री.कुळे सर व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें