बारसू गावातील शेतकऱ्याने दिले मोराला जीवदान
राजापुर ~पुरुषोत्तम खांबळ
दि. 26 नोव्हेंबर वार गुरुवार रोजी संध्याकाळी बारसू गावातील शेतकरी सुरेश धनवी यांना त्यांच्या शेतामध्ये मोर सापडला. तो मोर पायाला दुखापत झालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याला चालता आणि उडता येत नव्हते. त्यानंतर त्यांनी त्या मोराला आपल्या घरी घेऊन येऊन पाणी पाजले व त्याला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेतली. तसेच त्यांनी गावचे पोलिस पाटील हरेश कदम यांना कळवले. त्यांनतर पोलिस पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी श्री कुंभार सर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या कडे सुपूर्त करण्याचे ठरवले व त्याचप्रमाणे गावचे पोलिस पाटील हरेश कदम, गावचे प्रमुख पाटील सुदर्शन कदम, त्याचबरोबर सहकारी मित्र सचिन धनवी, सुप्रेश घामत व सुरेश धनवी यांचा मुलगा अंकुश धनवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पक्षी मोर वन विभागाकडे रात्री सुपूर्त करण्यात आला. अशा प्रकारे मोराला जीवदान दिले.











