खेड शहरातील रोझनीन देसाई यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खेड शहरातील रोझनीन देसाई यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्षपदी नियुक्ती

खेड : खेड शहरातील रोझनीन जमिळ देसाई यांची शिवसेना (मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे) अल्पसंख्यांक महिला सेलच्या खेड शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री तथा खेड-दापोलीचे आमदार मा. योगेशभाऊ कदम यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

खेड आणि दापोली येथील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक भक्कम करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तालुक्यात सध्या विविध पातळीवर सुरू असलेल्या फेरबदलांच्या मालिकेत ही नियुक्ती विशेष लक्षवेधी ठरत आहे.

या नव्या जबाबदारीनंतर रोझनीन देसाई यांना शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार देसाई यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक महिला सेलच्या शहराध्यक्ष या नात्याने त्यांचा कार्यकाळ एक वर्षांचा असेल, असेही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]