किल्ले रायगडावर निसर्गप्रेमी संस्थेची भव्य स्वच्छता मोहीम; तरुणांनी अनुभवला शिवइतिहास

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

किल्ले रायगडावर निसर्गप्रेमी संस्थेची भव्य स्वच्छता मोहीम; तरुणांनी अनुभवला शिवइतिहास

 

नवी मुंबई (प्रतिनिधी : मंगेश जाधव)

दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथील निसर्गप्रेमी संस्था अध्यक्ष श्री. सुनील कर्पे सर यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक किल्ले रायगड येथे भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

 

मोहीमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणी मानाचा मुजरा करून करण्यात आली. गडस्वच्छतेच्या माध्यमातून शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्याची संधी मिळाल्याने सर्व स्वयंसेवकांनी आनंद व्यक्त केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर सेवा करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,” असे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कर्पे यांनी या वेळी सांगितले.

 

या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती –

श्री. सुनील कर्पे सर (अध्यक्ष), श्री. रविंद्र पाटील सर, श्री. पंकज कुमार पाटील सर, श्री. लोंढे वैभव सर, श्री. सोळुंके जितेंद्र सर, श्री. इंगळे चंद्रकांत सर, श्री. राजपूत महेंद्र सर, श्री. बेलदार रामेश्वर सर.

 

तरुण स्वयंसेवकांमध्ये –

कुणाल पाटील, प्रथमेश मुटकुळे, आदित्य उपादे, नील सोनावणे, शिवानी जगताप, रिया शिंदे, अपूर्वा वाघमारे, प्रक्षिक गोतपगार, ओम वाघ, राजमाला वाकचौरे, प्रियांका भंडारे, गिरीजा पाटील, केसर चव्हाण

हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्वच्छता मोहिमेद्वारे गडसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देत निसर्गप्रेमी संस्था यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]