धक्कादायक! चिपळूणात २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

धक्कादायक! चिपळूणात २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

चिपळूण (वार्ताहर): चिपळूण शहरातील मार्कंडी येथील राहत्या घरी २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शुभम रवींद्र सावर्डेकर (वय २३, रा. मार्कंडी, चिपळूण) असे आहे. सावर्डेकर कुटुंब अनेक वर्षांपासून मार्कंडी परिसरात वास्तव्यास आहे. शुभम हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिक्षण सुरू असतानाच त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्याला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. शुभमचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह चिपळूण येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला.

शुभमने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

परिसरातील काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार शुभम हा शांत, मनमिळावू आणि अभ्यासू स्वभावाचा होता. घर व शिक्षण यांचा समतोल साधत तो आपले आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आतापर्यंत तरी त्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या घटनेमागचे खरे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

टीप : कोणालाही मानसिक ताण, नैराश्य किंवा संभ्रम वाटत असल्यास तात्काळ कुटुंबीयांशी, मित्रांशी किंवा समुपदेशकाशी मन मोकळे करावे. आत्महत्या हा कधीच पर्याय नाही 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें