समाजसेवक, लेखक श्री.अनिल तावडे यांना “कोकणरत्न पदवी” गौरव जाहीर

समाजसेवक, लेखक श्री.अनिल तावडे यांना “कोकणरत्न पदवी” गौरव जाहीर

 

मुंबई – प्रविणभाऊ पवार 

 

देवगड तालुक्यातील शिरगावचे सुपुत्र मुंबईस्थित सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लेखक, दिग्दर्शक, मुक्त पत्रकार, समाजसेवक श्री.अनिल वासुदेव तावडे यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे “कोकणरत्न” पदवीसाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.

 

त्यांच्या गेल्या पन्नास वर्षांच्या सातत्त्यपूर्ण कारकिर्दीतील अष्टपैलू अशा सामाजिक कार्य योगदानाची दखल घेत हि निवड करण्यात आलेली आहे.

 

 

या गौरव सोहळ्याचे आयोजन शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक- अध्यक्ष श्री.संजय कोकरे हे भूषवणार असून वरिष्ठ पत्रकार श्री.सचिन कळझुनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

मोजक्याच योग्य व्यक्तींच्या सामाजिक कार्याची दखल घेतल्या जाणाऱ्या कोकणरत्न पदवी या सन्मानाबद्दल श्री.अनिल तावडे यांचेवर विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहून शुभेच्छा द्यावे असे आवाहन आवाहन समाजसेवक महेंद्र तावडे यांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें