खोडदे येथे वाघाची दहशत, रमाकांत साळवी यांच्या वाड्यातील वासराला मारले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोडदे येथे वाघाची दहशत, रमाकांत साळवी यांच्या वाड्यातील वासराला मारले

ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांमध्ये घबराट, वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा ग्रामस्थांची आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम )
वाढत्या जंगलतोडीमुळे वन्य प्राणी मानव वस्तीकडे येत असतानाच गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथील माजी पोलीस पाटील आणि प्रगतशील शेतकरी रमाकांत विष्णू साळवी यांच्या चिरेबंदी वाड्यातील अवघ्या सात दिवसाच्या वासराला मध्यरात्री चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाघाने ठार मारले या वाड्यात अन्य गुरेही होती. परंतू ती गुरे बांधलेली असली तरी गुरे उधलली गुरांनी एकजुटी पुढे वाघाला परतीचा मार्ग गाठवा लागला. पंधरा दिवस अगोदर एका वासराला जंगलामध्ये वाघाने मारलेल्या ची घटना ताजी असताना काल मध्य रात्री ही घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराड निर्माण झाली आहे. तरी वन विभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी खोडदे ग्रामस्थांच्याकडून करण्यात येत आहे
आज पहाटे गाईंचे दूध काढण्यासाठी रमाकांत साळवी आणि त्यांचा मुलगा सर्वेश साळवी हे वाड्यामध्ये गेले असता. चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाघाने आत मध्ये प्रवेश करून वासरू ठार मारल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यांनी ग्रामस्थांना व सरपंच पोलीस पाटील तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व वनपाल मांडवकर, प्रथमेश पवार यांना कळवली. दहशतवादी वाघाचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. विभागाचे वनपाल मांडवकर, प्रथमेश पवार, खोडदेच्या सरपंच कु. पूजा गुरव, पोलीस पाटील सौ. योगिता पवार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वस्तुस्थिती खरी असल्याचे निदर्शनात आले. जंगलतोडीमुळे वन्यप्राणी मानव वस्ती कडे येत असल्याने वन विभागाने जंगलतोडीवर पण आळा घालावा याशिवाय वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा आग्रही मागणी खोडदे गावातून करण्यात येत आहे

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]