सजगतेतून सक्षमीकरणाकडे : महिला सुरक्षेचा प्रेरणादायी संवाद

सजगतेतून सक्षमीकरणाकडे : महिला सुरक्षेचा प्रेरणादायी संवाद

नवीमुंबई (मंगेश जाधव)

पनवेल तालुक्यातील रयत शिक्षण संस्था संचलित परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आ. धों. म्हात्रे ज्युनिअर कॉलेज व आय. टी. आय., नावडे यांच्या संयुक्त माध्यमातून महिला सुरक्षा मार्गदर्शन या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विधी सेवा समितीचे पी.एल.व्ही. तथा प्रमुख व्याख्याते शैलेश कोंडसकर यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

 

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. विशाखा मोहिते मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या विशाखा समितीचे प्रमुख सन्माननीय ज्येष्ठ Adv. शशिकांत म्हात्रे सर यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून देत प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.

 

या वेळी प्रमुख व्याख्याते शैलेश कोंडसकर यांनी इतिहासातील विविध दाखले देत महिला सुरक्षा, सामाजिक जबाबदारी आणि मूल्याधिष्ठित विचार यावर प्रभावी व प्रेरणादायी मांडणी केली.

 

तसेच Adv. ज्योती उरणकर मॅडम (वकील संघटना सदस्या, पनवेल) यांनी ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींशी संवाद साधताना POCSO कायदा, किशोरवयातील मानसिक व भावनिक बदल, या वयात येणाऱ्या अडचणी, योग्य-अयोग्याची ओळख तसेच स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर व समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले.

 

याच कार्यक्रमात Adv. विकी दुशिंग सर यांनी महिला सक्षमीकरणाच्या व्यापक दृष्टिकोनातून आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी लिंगनिदान चाचणी प्रतिबंधक कायदा यापासून ते बालिकेच्या जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक, कायदेशीर व मानसिक प्रश्नांपर्यंत विविध आयामांना स्पर्श करत अत्यंत संवेदनशील व अभ्यासपूर्ण मांडणी केली.

 

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें