खरे–ढेरे महाविद्यालय प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासक नियुक्त, १० लाखांचा दंड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खरे–ढेरे महाविद्यालय प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासक नियुक्त, १० लाखांचा दंड

गुहागर येथील खरे–ढेरे महाविद्यालयात नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना थेट अंतिम वर्षात प्रवेश देऊन, परीक्षेला न बसवता पदवी प्रमाणपत्र देण्याचा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला होता. या बेकायदेशीर कामास नकार देणाऱ्या काही प्राध्यापकांना संस्थाचालकांनी बेदम मारहाण केल्याने हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले.

या प्रकरणाविरोधात गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी गेले वर्षभर प्रत्येक अधिवेशनात सातत्याने आवाज उठवत शासनाचे लक्ष वेधले. नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातही शासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

अखेर शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत खरे–ढेरे महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, संस्थेवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्राध्यापक वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर आज प्राध्यापकांच्या बुक्टू संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे तसेच खरे–ढेरे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या ठाम व निर्भीड भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले.



 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]