२१–० ने विरोधकांचा धुव्वा; खेड नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता. मंत्री योगेश कदम यांची यशस्वी रणनीती.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२१–० ने विरोधकांचा धुव्वा; खेड नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता. मंत्री योगेश कदम यांची यशस्वी रणनीती.

खेड :~ वार्ताहर

खेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. तब्बल २१–० अशा ऐतिहासिक फरकाने विजय मिळवत महाविकास आघाडीला एकही जागा मिळू दिली नाही.

 

“बोललेला शब्द खरा करून दाखवला,” अशी प्रतिक्रिया देत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी या विजयाचे श्रेय खेडमधील जनतेला दिले. २ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये सत्ता कोणाची येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निकालाने स्पष्ट केले की खेड नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.

 

या निकालात महाविकास आघाडीला आपले खातेही उघडता आले नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या विजयानंतर श्रीमती माधवी बुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार असून, खेड शहरात एका नव्या विकासपर्वाची सुरुवात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

या ऐतिहासिक विजयाबद्दल आणि शिवसेना–महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल खेडवासीयांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]