गुहागर नगरपंचायत: नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार

गुहागर नगरपंचायत: नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार

 

गुहागर~(सुजित सुर्वे)

नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना आ. जाधव यांनी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांसह गुहागर शहर व तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने काम करावे, असे मत आ. जाधव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें