विद्यार्थ्यांनी आवड व क्षमतेनुसार करिअर निवडावे – माधव अंकलगे

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांनी आवड व क्षमतेनुसार करिअर निवडावे – माधव अंकलगे

रत्नागिरी प्रतिनिधी:- निलेश रहाटे

जयगड पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्या मंदिर जयगड या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात करिअरच्या नव्या वाटा.. या विषयांवर मार्गदर्शन करताना व्याख्याते श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक मा. प्रदीप वाघोदे सर यांनी स्वागत केले, तर प्रा. भुवड सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार करिअर निवडण्याचे महत्त्व सांगून, इयत्ता दहावी व इयत्ता बारावी नंतर कोणकोणते व कोणत्या विषयाला अनुसरून करिअर करता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उपलब्ध संधी आणि करिअरची विविध क्षेत्रे याबाबत उपस्थिताना उदाहरणांसह माहिती दिली.

यासोबतच यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गात परीक्षेला सामोरे जाताना ताण – तणाव न घेता वेळ, विषयाची काठिण्यपातळी, आहार आणि आरोग्य यांचा समन्वय साधून अभ्यासाचे नियोजन केल्यास यश गाठता येते, हा आत्मविश्वास बाळगण्याची आवश्यकता सांगितली.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा. प्रदीप वाघोदे, शाळेचे शिक्षक मा. पाटील सर, मा. तडवी सर, मा. जोशी मॅडम आणि मा. भुवड सर, यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]