रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची निवे येथे बैठक

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची निवे येथे बैठक

राजापुर -लांजा-(_जितेंद्र चव्हाण )

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोसुंब जिल्हा परिषद अंतर्गत निवे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक निवे पंचायत समिती गणासाठी आयोजित करण्यात आली होती.

 

सदर बैठक संगमेश्वर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मा. अंजली यादव यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. बैठकीस दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. नरूदीन सय्यद प्रमुख उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी काशिराम वाजे, अशोकराव जाधव, दिलीप मोहिते, अशोक पवार, रविंद्र गुरव, विरेंद्र पवार, पांडूरंग रहाटे, सुरेश भत्ते यांच्यासह निवे पंचायत समिती गणातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बूथ पातळीवरील कामकाज, मतदारांशी थेट संपर्क, तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार प्रभावीपणे करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]