राजापूर तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे नातेवाईकांकडून महिलेला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

crim

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे नातेवाईकांकडून महिलेला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर -तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घराच्या अंगणात घडली.

या प्रकरणी २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा राजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर शंकर धामापुरकर (वय ६०), एक ७० वर्षीय महिला आणि सागर भास्कर धामापुरकर (वय २१, सर्व रा. सोलगाव, धामापुरकरवाडी, ता. राजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून, त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू आहेत. २३ डिसेंबर रोजी रात्री भास्कर धामापुरकर यांच्या घरातून मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून फिर्यादी महिला त्यांच्या घराच्या अंगणात गेल्या.

मात्र, फिर्यादी तेथे आल्याचा राग येऊन भास्कर धामापुरकर यांनी ‘तू तुझ्या घरात जा, इकडे थांबू नकोस’ असे म्हणत वाद घातला व त्यांच्या गालावर चापट मारली. त्यानंतर गुरांना मारण्यासाठी ठेवलेली काठी उचलून फिर्यादीच्या पाठीवर मारून दुखापत केली.

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ७० वर्षीय संशयित महिलेनेही तिच्या हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण केली व शिवीगाळ केली. तसेच सागर धामापुरकर याने हाताच्या ठोशाने व चापटाने गालावर मारून दुखापत केली.

या घटनेनंतर काही दिवसांनी फिर्यादी महिलेने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११६(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.


  •  
RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]