हिंदू खाटीक समाजासाठी स्वंयरोजगार कर्ज योजना; ५० हजार ते ५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदू खाटीक समाजासाठी स्वंयरोजगार कर्ज योजना; ५० हजार ते ५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

रत्नागिरी :

जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध स्वंयरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

महामंडळामार्फत ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच एनएसएफडीसी योजना अशा चार प्रमुख योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनांअंतर्गत ५० हजार रुपयांपासून ते ५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. जून २०२५ पासून या योजनांची अंमलबजावणी सुरू असून स्वंयरोजगार व लघुउद्योगांना चालना देणे हा यामागील उद्देश आहे.

योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे :

🔹 ५०% अनुदान योजना :

प्रकल्प मर्यादा रुपये ५०,०००/- पर्यंत. प्रकल्प खर्चाच्या ५०% किंवा कमाल रुपये २५,०००/- पर्यंत अनुदान दिले जाते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते. कर्जाची परतफेड साधारणतः ३ वर्षांत करावी लागते.

🔹 बीज भांडवल योजना :

प्रकल्प मर्यादा रुपये ५०,००१/- ते ५,००,०००/- पर्यंत. प्रकल्प खर्चाच्या २०% बीजभांडवल महामंडळामार्फत ४% वार्षिक व्याजदराने दिले जाते. यामध्ये ५०% किंवा कमाल रुपये ५०,०००/- पर्यंत अनुदानाचा समावेश आहे. बँकेकडून ७५% कर्ज देण्यात येते. परतफेड कालावधी ३ ते ५ वर्षे असून अर्जदाराचा ५% स्वतःचा सहभाग आवश्यक आहे.

🔹 थेट कर्ज योजना :

प्रकल्प मर्यादा रुपये १,००,०००/- पर्यंत. यामध्ये ५०% किंवा कमाल रुपये ५०,०००/- अनुदान व उर्वरित रक्कम महामंडळामार्फत ४% व्याजदराने कर्ज स्वरूपात दिली जाते. कर्जाची परतफेड ३ वर्षांत करावी लागते.

🔹 एनएसएफडीसी योजना :

प्रकल्प मर्यादा रुपये १,४०,०००/- पर्यंत. एकूण प्रकल्प खर्चाच्या ९०% अर्थसहाय्य एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत मिळते. यामध्ये कमाल रुपये ५०,०००/- पर्यंत अनुदान असून उर्वरित रक्कम बीजभांडवल स्वरूपात दिली जाते.

पात्रता अटी :

अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजातील असावा. वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागासाठी रुपये ३ लाख इतकी आहे. अर्जदार कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासनाच्या कर्ज योजनेचा थकबाकीदार नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

जात व उत्पन्न प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड/मतदान ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, व्यवसायासाठी आवश्यक कोटेशन, जागेचा पुरावा, व्यवसायानुसार परवाने/लायसन्स, प्रकल्प अहवाल तसेच बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]