शिवाज्ञा फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप; राजमाता जिजाऊ स्मृतीदिनी अनोखी मानवंदना

शिवाज्ञा फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप; राजमाता जिजाऊ स्मृतीदिनी अनोखी मानवंदना

 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच तिवरे व रिक्टोली शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

 

गुहागर -प्रतिनिधी :

बुधवार दिनांक १७ जून २०२६ रोजी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शिवाज्ञा फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे नं. १ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त छत्री वाटप करण्यात आले.

 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शिवाज्ञा फाऊंडेशनने हा सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

 

यावेळी शिवाज्ञा फाऊंडेशनचे संघराज जाधव, निरंजन पाकळे, साईराज सुर्वे, ओम गंगावणे, सुश्मिता मोरे, नेहा पालशेतकर, स्नेहा मालप, अक्षता जोशी, नेहा घाडे, साक्षी मेटकरी, आदिष्टी पाकळे तसेच गावातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. सखाराम तिवरेकर उपस्थित होते.

 

रिक्टोली-गावठण शाळेचे शिक्षक श्री. राजेश केरुशेट लकेश्री सर, सौ. निलम किशोर मोहिते मॅडम तसेच तिवरे शाळेचे श्री. प्रकाश रामचंद्र पेंढारकर व सहकारी वृंद यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मानसी मंगेश म्हैसकर, उपाध्यक्षा सौ. सोनाली नामदेव शिंदे, श्री. अरविंद पुतळाजी शिंदे, सौ. मीनाक्षी अमृत शिंदे, सौ. प्रतिभा संदीप शिंदे, श्रीमती सीमा श्रीधर शिंदे आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना श्री. ओम गंगावणे म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेच्या मस्तकावर चारशे वर्षांपूर्वी ज्या माऊलीने मायेचे छत्र धरले, त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना आज या छोट्याशा उपक्रमातून मानवंदना देत आहोत. या कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकवृंदाचे आम्ही मनापासून आभार मानतो.”

 

शिवाज्ञा फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.


SEO Keywords: शिवाज्ञा फाऊंडेशन, शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप, तिवरे शाळा, रिक्टोली गावठण शाळा, राजमाता जिजाऊ स्मृतीदिन, सामाजिक उपक्रम, रत्नागिरी जिल्हा बातमी

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें