पाटपन्हाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांचे निधन

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाटपन्हाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांचे निधन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील बौध्दजन सहकारी संघ पाटपन्हाळे शाखा क्र. 11 या शाखेचे माजी सल्लागार दिवंगत गणपत भिकू कदम यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते 1988 च्या शतकात मिलकामगार असताना त्यांनी आपल्या तीन मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले. मोठे चिरंजीव प्रकाश हे इन्कम टँक्स क्षेत्रात अधिकारी असुन दुसरे चिरंजीव खाजगी नोकरी करत आहेत.गणपत कदम यांचा गावाच्या सामाजिक शैक्षणिक प्रगती मध्ये मोलाचा वाटा असायचा अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर म्हणून त्यांनी आपली समाजात ओळख निर्माण केली.त्यांच्या पश्चात भाऊ. बहीण. मुलगे मुलगी. जावई. नातवंडे पत्नी असा मोठा परिवार आहे त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवार दि. 21/6/2026 रोजी सकाळी 10:00 वा. त्यांच्या राहात्या घरी मु. पो. पाटपन्हाळे (कदमवाडी)ता. गुहागर या ठिकाणी होणार असुन सर्व दु:खीद बांधवानी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेळेत उपस्थित राहावे असे शाखेचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी विन्रम आवाहन केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]