तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मासू नं १ शाळेचे यश

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मासू नं १ शाळेचे यश

 

गुहागर ~ जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर आयोजित तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 नुकत्याच वरदान हायस्कूल पालपेणे, ता. गुहागर येथे संपन्न झाल्या.

50 मीटर धावणे ( लहान गट मुली) क्रीडा प्रकारात जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा मासू नं १ शाळेच्या इयत्ता ५ वी मधील ” अनुष्का मंगेश आलीम हीने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय स्पर्धेत तीने प्रवेश मिळविला आहे.यापूर्वी झालेल्या केंद्र स्तरीय व बीटस्तरीय स्पर्धेतही अनुष्का ने प्रथम क्रमांक पटकावला होता.

 

तीच्या या उज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश मास्कर, ग्रामविकास मंडळ मासू अध्यक्ष विजय मसूरकर ,मुंबई मंडळ अध्यक्ष अशोक मास्कर, सेक्रेटरी सुधाकर मास्कर, पांडुरंग नाचरे, महादेव नाचरे, सखाराम मास्कर, संजीवनी नाचरे, सिमरन नाचरे,पोलिसपाटील शेखर आलीम,राजेशजी मासवकर, राजेश भोजने,सुनील नाचरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुळये सर व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे. तसेच परिसरातूनही तीचे अभिनंदन होत आहे. तीच्या या यशाबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी प्रविण अनंत मास्कर व विशाल मास्कर यांनी २०००/- चे बक्षीसही दिले आहे.पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी तीला लाख लाख शुभेच्छा!!.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें