सोमवारी गुहागर तालुक्यातील चिखली येथे गुरे – ढोरे, शेळ्या – मेंढ्या यांच्या उपबाजार आवाराचा उदघाटन सोहळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी गुहागर तालुक्यातील चिखली येथे गुरे – ढोरे, शेळ्या – मेंढ्या यांच्या उपबाजार आवाराचा उदघाटन सोहळा

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिखली ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत कार्यालया शेजारी पाळीव प्राणी, गुरे – ढोरे, शेळ्या – मेंढया यांच्या उपबाजार आवाराचा उदघाटन सोहळा सोमवार दिनांक 05 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आला असून या उदघाटन सोहळ्याला पालकमंत्री व उद्योगमंत्री नाम. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भास्करशेठ जाधव यांचे शुभ हस्ते या उपबाजाराचे उदघाटन होणार असून या भव्य दिव्य सोहळ्याचे अध्यक्षस्थान गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. विनय नातू भूषवणार असून या भव्य दिव्य सोहळ्याला सहकारी संस्था रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपानराव शिंदे, बाजार समिती सभापती आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संदीप सुर्वे, गुहागरच्या नगराध्यक्ष सौ. नीता मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत महाजन आदी. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या गुरे – ढोरे, शेळ्या – मेंढ्या यांच्या उपबाजार उदघाटन सोहळ्यास गुहागर तालुक्यातील शेतकरी जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे सभापती संदीप सुर्वे, संचालक गजानन पाटील, अरविंद आंब्रे, सुरेश सावंत, मधुकर दळवी, सुरेश कांबळे, हेमचंद्र माने, सौ. स्नेहल बाईत, स्मिता दळवी, विजय टाकळे, नैनेश नारकर, रोहित मयेकर, ओंकार कोलते, प्रशांत शिंदे, सचिव पांडुरंग कदम, चिखली ग्रामपंचायत सरपंच सौ. मानसी मंगेश कदम, उपसरपंच सुभाष दळवी, पराग जोगळे, सदस्य विजय गमरे, सदस्या सौ. साक्षी साळवी,सौ. निलम गमरे, सौ. मधुरा सोलकर, सौ. निधी गांगण, सौ. मधुरा गोयथळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]