पाचेरी सडा नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

पाचेरी सडा नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

 

गुहागर (वार्ताहर):

पाचेरी सडा नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

कबड्डी व खो-खो या सांघिक खेळांमध्ये शाळेतील एकूण सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कबड्डी प्रकारात विपुल विकास घाणेकर व अथर्व विकास डिंगणकर, तर खो-खो प्रकारात साहिल संदीप डिंगणकर, विराज रामचंद्र डिंगणकर, आर्यन संदीप डिंगणकर, रिद्धी संजय पंडये व सिद्धी सुनील डिंगणकर यांची निवड झाली आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात थाळी फेक या प्रकारासाठी सृति श्रीधर भुवड हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

दरम्यान, पाचेरी आगर केंद्रातील वरिष्ठ शिक्षक तसेच पाचेरी सडा नं. १ चे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ यांची खो-खो जिल्हास्तरीय पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचेही सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

या यशाबद्दल मा. सरपंच श्री. संतोषजी आंब्रे व शा. व्य. स. अध्यक्ष श्री. अनिलजी जोशी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें