युवक – युवतींना वाहक चालक या पदावर कंत्राटी पद्धतीने काम करण्याची संधी द्यावी – परिवहन मंत्र्यांकडे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद चाचे यांची आग्रही मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

युवक – युवतींना वाहक चालक या पदावर कंत्राटी पद्धतीने काम करण्याची संधी द्यावी – परिवहन मंत्र्यांकडे काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद चाचे यांची आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम)

रत्नागिरी परिवहन विभाग वाहक – चालक कर्मचारी कमतरता असल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील युवक युवतींना

कंत्राटी पद्धतीने वाहक – चालक पदावर काम द्यावे अशी आग्रही मागणी गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .या निवेदनात मिलिंद चाचे पुढे म्हणतात की, कोकण परिवहन विभागांमध्ये वाहक – चालक यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून रत्नागिरी परिवहन आणि पालघर परिवहन विभागा मधून गतवर्षामध्ये वाहक – चालक यांची बदली मोठ्या प्रमाणात होत असते आणि बदल्या झालेल्याही आहेत. या विभागाला काम करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. मिलिंद चाचे यांनी परिवहन मंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पालघर परिवहन विभागामधील विरार आगार मधून विरार – भातगाव गाडीची मागणी विभाग नियंत्रक पालघर यांना केलेली असता पालघर विभागाने वाहक आणि चालक कमतरतेचे कारण पुढे केले असून वाहक – चालक यांची बदली झाली असल्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये एसटी बस सोडणे शक्य नाही. ही अडचण पाहता गुहागर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद चाचे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील युवक – युवतींना वाहक – चालक पदावर कंत्राटी पद्धतीने काम द्यावे. त्यामुळे युवक – युवतींना रोजगारही मिळेल आणि महामंडळाचे कामही सुरळीत चालेल असेही मिलिंद चाचे यांनी या निवेदनात नमूद केलेले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]