प्रवासी संघटना, तालुका गुहागर विभाग मुंबईची जनरल सभा उत्साहात संपन्न

प्रवासी संघटना, तालुका गुहागर विभाग मुंबईची जनरल सभा उत्साहात संपन्न

 

तळवली (मंगेश जाधव):

प्रवासी संघटना, तालुका गुहागर विभाग मुंबई यांची जनरल सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंड वसतिगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ही सभा प्रवासी संघटना ग्रामीण विभागाचे अध्यक्ष श्री. पराग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामीण संघटनेचे खजिनदार श्री. अरुण भुवड यांची विशेष उपस्थिती होती.

 

सभेच्या प्रारंभी ग्रामीण अध्यक्ष श्री. पराग कांबळे, मुंबई विभाग अध्यक्ष श्री. भरत भुवड, कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र पवार व उपाध्यक्ष श्री. गौरव शिरगांवकर यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठुरायाला पुष्पहार अर्पण करून सभेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर घुमे यांच्या वडिलांचे तसेच ग्रामीण शाखेचे माजी खजिनदार स्व. बसणकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने, त्यांना तसेच गुहागर तालुक्यातील सर्व ज्ञात-अज्ञात स्वर्गस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

सभेत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आपली ओळख करून दिली. मान्यवरांचे यथोचित पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मुंबई विभाग अध्यक्ष श्री. भरत भुवड यांनी आपल्या भाषणात, “आपण समाजसेवेचे कार्य करत आहोत. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा प्रवासी संघटनेच्या कामासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन केले.

 

कार्याध्यक्ष ॲड. राजेंद्र पवार व उपाध्यक्ष श्री. गौरव शिरगांवकर यांनी संघटनेची ध्येयधोरणे व पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रवासी संघटनेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी, तसेच गुहागर तालुक्यातील प्रत्येक गाव-वाडीतील नागरिकांचा सहभाग असावा, संघटना जात-पात व राजकारणविरहित असावी, अशी सर्वानुमते मते मांडली.

 

अध्यक्षीय भाषणात श्री. पराग कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. गुहागर डेपोतील कमतरता व आवश्यक सोयी-सुविधांबाबत मार्गदर्शन करत ग्रामीण व मुंबई विभागातील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रवासी संघटना कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने येणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी संघटना प्रयत्नशील राहील, असे सांगून त्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

 

सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवासी संघटना तालुका गुहागर विभाग मुंबईचे सचिव श्री. अनिल गोविंद भुवड यांनी केले.

 

गुहागर तालुका प्रवासी संघटना (मुंबई विभाग) – कार्यकारिणी

 

– अध्यक्ष: श्री. भरत भुवड

– कार्याध्यक्ष: ॲड. राजेंद्र दामोदर पवार

– उपाध्यक्ष: श्री. लवू रघुनाथ राऊत, श्री. संजय कळंबटे, श्री. रघुनाथ घुमे, श्री. गौरव विरेंद्र शिरगांवकर

– सचिव: श्री. अनिल गोविंद भुवड

– खजिनदार: श्री. श्रीकांत कातकर

– सह-खजिनदार: श्री. मनोहर घुमे, श्री. सुनील प्रकाश कुळे

(सहसचिव व कार्यकारिणी सदस्यांची विस्तृत यादी सभेत जाहीर करण्यात आली.)

विशेष घडामोडी

– जेष्ठ नागरिक कल्याणातून येऊन अनेकांनी सभेला हजेरी लावली

– ग्रामीण व मुंबई विभागाची ६/५ नुसार धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्याचा निर्णय

– विकलांग कार्यकर्त्यांचीही उल्लेखनीय उपस्थिती

– वार्षिक सदस्य वर्गणी ₹१२० सर्वानुमते मंजूर

– श्री. सुनील प्रकाश कुळे यांची सह-खजिनदार म्हणून नियुक्ती

गुहागर तालुका प्रवासी संघटना, मुंबई विभागाची ही विशेष सभा मोठ्या संख्येने उपस्थिती आणि उत्साहात पार पडली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें