सायंबाचीवाडीत मकरसंक्रांतीनिमित्त महिलांचा उत्सव उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सायंबाचीवाडीत मकरसंक्रांतीनिमित्त महिलांचा उत्सव उत्साहात साजरा

बारामती (पुणे):

सावित्री महिला सक्षमीकरण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य (रजिस्ट्रेशन क्र. महा/११६४/२०२५, पुणे) यांच्या वतीने मकरसंक्रांतीच्या औचित्याने दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यातील लोणीभापकर सायंबाचीवाडी येथील स्वयंभू मंदिर परिसरात तसेच संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर यांच्या निवासस्थानी महिलांसाठी हळदी-कुंकू व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

ग्रामीण भागात आयोजित या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात माधुरी चव्हाण (बारामती) यांनी दिलेले ७० वाण उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. या सहकार्याबद्दल फाउंडेशनच्या वतीने चव्हाण ताई यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाला कृषी सखी रोहिणी ताई इंगळे, बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या सदस्य लता ताई जगताप, स्वयंभू पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता ताई घाडगे यांच्यासह विविध बचत गटांतील महिला आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

या उपक्रमाचे नियोजन संस्थापक अध्यक्ष राहुल जगन्नाथ भापकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमात त्यांच्या मातोश्री मंगल भापकर यांच्या हस्ते महिलांना हळदी-कुंकूचा करंडा व तिळगुळ देऊन वाण वाटप करण्यात आले. महिलांच्या सहभागामुळे आणि आनंदी वातावरणामुळे हा मकरसंक्रांती उत्सव संस्मरणीय ठरला.अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी.

 नंदकुमार बगाडे पाटील

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]