सर्वांचे आशीर्वाद आणि साथ मला हवी आहे – सिद्धी रामगडे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांचे आशीर्वाद आणि साथ मला हवी आहे – सिद्धी रामगडे

आबलोली (संदेश कदम)

येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी वेळणेश्वर गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत मी उमेदवार म्हणून तुमच्यासमोर आले आहे. मी तुमच्या सारखीच एक सर्व सामान्य मुलगी आहे .मी एक व्यावसायिक आहे आता मला संधी मिळाली आहे.. ती म्हणजे राजकारणात पुढे येऊन मी समाजसेवा करावी.. यासाठी तुमचे सर्वांचे आशीर्वाद मला हवे आहेत आणि तुमची साथ मला हवी आहे. मशाल चिन्ह लक्षात ठेवा हे मशाल चिन्ह निशाणी प्रत्येकाच्या घराघरात पोचवा आणि मशाल चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती करायला मी आपल्याकडे आलेले आहे असे स्पष्ट मत कोतळूक येथील बैठकीत जिल्हा परिषद वेळणेश्वर गटाच्या उमेदवार सिद्धी संतोष रामगडे यांनी व्यक्त केले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका सचिव विलास गुरव, शीर पंचायत समिती गणाच्या उमेदवार ॲड. ज्योत्स्ना विनायक काताळकर, उपतालुका प्रमुख अंकुश शिगवण, उपविभाग प्रमुख निखिल मोरे, माजी सभापती गणपत शिगवण, शाखाप्रमुख आनंद शिगवण यांच्यासह कुणबी समाजाचे मतदार बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]