मंगळवार दि.२० रोजी गुहागर तालुक्यातील खोडदे येथे श्री.प.पू. स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवार दि.२० रोजी गुहागर तालुक्यातील खोडदे येथे श्री.प.पू. स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे देवस्थानचे अध्यक्ष विनायक अनंत गुरव, संतोष अनंत गुरव यांच्या निवासस्थानी श्री.प.पू. स्वामी गगनगिरी महाराज देवस्थान खोडदे देऊळवाडी यांच्या वतीने माघ शुद्ध २ धर्मनाथ बीज नवनाथांची व गगनगिरी महाराज व सत्यनारायणाची महापूजा मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून गुहागर तालुक्यातील जनतेने या कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विनायक अनंत गुरव, संतोष अनंत गुरव, मिरा, मानसी, पूनम, स्वागम, सोहम, ऋत्विक, गायत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी पहाटे ०५:३० वाजता प.पू. स्वामी गगनगिरी महाराज पूजन व काकड आरती, सकाळी ०७:०० वाजता धर्मराज बीज नवनाथ यांची पूजा, सकाळी ०८:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर दुपारी ०१:०० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर सायंकाळी ०६:०० वाजता दीप प्रज्वलन झाल्यानंतर सायंकाळी ०६:३० वाजता महा आरती होईल त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील कालभैरव भजन मंडळ वेळणेश्वर बुवा श्री संदेश ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री ०८:०० वाजता गुहागर तालुक्यातील शिवणे येथील संतोष मिस्त्री यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले असून रात्री दहा वाजता स्थानिक शिवतेज भजन मंडळ खोडदे यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या संपूर्ण कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विनायक अनंत गुरव, संतोष अनंत गुरव, मीरा, मानसी, पूनम, स्वागम, सोहम, ऋत्विक, गायत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]