पाचेरी सडा पंचायत समिती गणातून सुचिता दत्ताराम घाणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पाचेरी सडा पंचायत समिती गणातून सुचिता दत्ताराम घाणेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

आबलोली (संदेश कदम):
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सुचिता दत्ताराम घाणेकर यांनी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

या प्रसंगी शिवसेना–भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. सुचिता घाणेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी पाचेरी सडा गणात जोरदार तयारी सुरू असून कार्यकर्त्यांकडून घरोघरी संपर्क व प्रचारावर भर दिला जात आहे.

त्यांच्या प्रचारासाठी पांडुरंग पाते, रामचंद्र हुमणे, तुकाराम निवाते, संदेश काजरोळकर, विशाल गोताड, यशवंत गोताड, यशवंत शितप, शंकर जोशी, विजय वैद्य, सुधाकर गोणबरे, रेणुका आग्रे, गावडे गुरुजी, विजय मोहिते, प्रकाश भोजने, रमेश वाघे, संतोष सावरकर, अंकुश हुमणे, तुषार हुमणे, दिलीप भुवड, सागर पाते, धर्मानंद यादव, संतोष बारस्कर, विजय भुवड, रवींद्र अवेरे, नंदू धांगडे, विक्रांत पागडे, रवी पवार, गंगाराम निवाते, संदीप साळवी, प्रदीप सुर्वे, राजेंद्र साळवी, अनंत पागडे, यशवंत पाष्टे आदी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

महायुतीच्या उमेदवाराला पाचेरी सडा गणातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें