संयुक्त गट नोंदणी नको! शिंदेसेनेने घेतला स्वतंत्र अस्तित्वाचा निर्णय

rv ad

संयुक्त गट नोंदणी नको! शिंदेसेनेने घेतला स्वतंत्र अस्तित्वाचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला दहा दिवस उलटून गेले असले तरी बहुमत मिळालेल्या भाजप–शिंदेसेना युतीकडून अद्याप कोकण आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यात आलेली नाही. महापालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांमधील सदस्यसंख्येवरून सुरू असलेल्या चर्चांमुळे दोन्ही पक्ष संयुक्त गट नोंदणी करतील, अशी शक्यता होती. मात्र संयुक्त नोंदणी केल्यास पुढील पाच वर्षे भाजपचे धोरण स्वीकारावे लागेल आणि शिंदेसेनेचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शिंदेसेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महापौर, उपमहापौर पदांसह स्थायी समितीतील सदस्यसंख्या, अध्यक्षपद आणि सत्तेचे गणित यावर दोन्ही पक्षांत सविस्तर चर्चा सुरू आहे. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्यसंख्या जवळपास समसमान आहे. संयुक्त नोंदणी झाल्यास सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य वाढू शकतो, मात्र त्याबदल्यात शिंदेसेनेला भाजपच्या भूमिकेला बंधनकारक पाठिंबा द्यावा लागेल, अशी अट असल्यानेच स्वतंत्र नोंदणीचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.


🔍 ठळक मुद्दे

• भाजप–शिंदेसेना युतीची अद्याप गट नोंदणी नाही
• संयुक्त नोंदणीमुळे सत्ताधारी गटाला एक सदस्य अधिक मिळण्याची शक्यता
• मात्र शिंदेसेनेचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येण्याची भीती
• महापालिकेत एकच गटनेता, एकच कार्यालय अशी अट चर्चेत
• स्थायी समितीतील संख्याबळावरून जोरदार राजकीय गणिते
• त्यामुळे शिंदेसेनेचा स्वतंत्र नोंदणीचा निर्णय


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें