सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

: सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

 

🔹 : राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन; बारामतीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काल महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यास राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

सुनेत्रा पवार या राज्यसभा खासदार म्हणून प्रभावी कामगिरीसाठी ओळखल्या जातात. सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणातील योगदानामुळे त्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या शपथविधीनंतर बारामतीतील जनतेनेही आनंद व्यक्त करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

महिला नेतृत्वाला सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान मिळाल्याने ही नियुक्ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाची मानली जात आहे.

 


Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें