ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हा महिला विभाग सचिवपदी पत्रकार किरणताई वाघ यांची निवड

 

देऊळगाव राजा :

भारत सरकार नोंदणीकृत व ग्राहकांच्या न्यायहक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा महिला विभाग सचिवपदी देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार सौ. किरणताई वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे व राष्ट्रीय सचिव अविनाश झोटिंग यांनी दिनांक १ फेब्रुवारी रोजी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

या निमित्ताने देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने किरणताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. किरणताई वाघ या संघाच्या सक्रिय सदस्या असून कोणताही कार्यक्रम असो, त्या नेहमी आवर्जून उपस्थित राहतात. सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या त्या सर्वांच्या लाडक्या ‘छकुलीताई’ म्हणून ओळखल्या जातात.

 

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना किरणताई वाघ म्हणाल्या की, ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे, अशा नागरिकांनी निर्धास्तपणे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

त्यांच्या निवडीबद्दल विदर्भ अध्यक्ष सचिन खंडारे, विदर्भ सचिव डॉ. गंगाराम उबाळे, प्रदेश कार्याध्यक्ष सुनील अंभोरे, जिल्हाध्यक्ष चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा इंगळे, जिल्हा कार्याध्यक्ष विजेता साळवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]