वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या नोकरी निमित्त मुंबई या ठिकाणी कार्यरत असलेले लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळालेले विनोद स्वभावाचे मा. मकरंद वैद्य यांना दिशा महाराष्ट्राची या युट्युब चैनलच्या वतीने मानाचा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मकरंद वैद्य यांनी मराठी गौरी वेबसिरिज आंबाट चिंबाट आय झेड कोकणातले तसेच हिंदी वेबसिरिज अनिर्वान नाटकें माका नको नाका अनेक युट्युब मध्ये महत्वपूर्ण भुमिका पार पाडल्या आहेत. देना मला साथ या टि सिरिजच्या गाण्यामध्ये सुध्दा सहभाग नोदविला आहे तसेच विविध प्रोडक्शन मध्ये विनोदी व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. मुंबई दहीसर परिसरात त्यांनी विनोदवीर म्हणून वेगळी छाप उमटविली आहे. त्यांच्या याच योगदानाबद्दल दिशा महाराष्ट्राची या युट्युब चैनलने मानाचा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने मा. एँण्ड विजय उंबरे यांच्या शुभ हस्ते मकरंद वैद्य यांना दि. 1/2/2026 रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन जुईनगर (सानपाडा )नवीमुंबई या ठिकाणी सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाला दिशा महाराष्ट्राची या चैनलचे संपादक मा. तुषार जी नेवरेकर सौ. सपना नेवरेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आत्माराम चव्हाण अभिनेते राजेश जाधव मा. अर्चना मोहीते एँण्ड विजय उंबरे निखिल सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]