डॉ. संतोष सावर्डेकर, कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला भेट

डॉ. संतोष सावर्डेकर, कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला भेट

रत्नागिरी –

दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला’ भेट देऊन प्रशासकीय बाबी आणि चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम, ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. संतोष सावर्डेकर यांचे स्वागत केले. कुलसचिव महोदयांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील प्रशासकीय बाबी, मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, विस्तार शिक्षण आणि संशोधन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. संशोधन केंद्रावर नवीन चालू केलेल्या ‘प्लवंग संवर्धन प्रकल्प’ बाबत माहिती घेऊन त्यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन केंद्रावर चालू असलेल्या महसुली उत्पादन प्रकल्पाबाबत प्रशंसा व्यक्त केली तसेच महसुली उत्पन्न वाढीकरिता नवीन कल्पनांचा विचार करण्याचे सुचविले. संशोधन केंद्राची पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नविन ईमारत बांधकाम याबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), डॉ. हरीश धमगाये (अभिरक्षक व प्राध्यापक) प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते व श्रीम. अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक), श्रीमती जाई साळवी (वरिष्ठ लिपिक) उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें