माहिती अधिकारी फेडरेशनचे रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार निलेश वी. रहाटे यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य (दक्षिण जिल्हा रत्नागिरी) उपाध्यक्ष पदी निवड

माहिती अधिकारी फेडरेशनचे रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख व पत्रकार निलेश वी. रहाटे यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य (दक्षिण जिल्हा रत्नागिरी) उपाध्यक्ष पदी निवड

 

रत्नागिरी :- निलेश रहाटे

माहिती अधिकारी फेडरेशनचे रत्नागिरी जिल्हा मुख्य संपर्क प्रमुख तथा पत्रकार श्री. निलेश वी. रहाटे यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या दक्षिण जिल्हा रत्नागिरी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनकर आमकर साहेब,राष्ट्रीयकार्य अध्यक्ष मा. मनोज हिरवे,राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ श्रद्धा जी सुर्वे मॅडम कोकण विभाग अध्यक्ष मा. डॉ. डी. एस. तळदेवकर साहेब तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. विजय जी बने साहेबयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ग्राहक हक्क संरक्षण, भ्रष्टाचाराविरोधातील लढा, शासन योजनांमधील पारदर्शकता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने कार्य करणारे श्री. निलेश रहाटे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्राहक संरक्षण विषयक जनजागृती, तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करणे, तसेच शासन व नागरिक यांच्यात समन्वय साधण्याचे काम अधिक प्रभावीपणे केले जाईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

श्री. रहाटे यांनी संस्थेच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत जिल्ह्यात ग्राहक हक्क संरक्षणासाठी ठोस व पारदर्शक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें