ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गणपत (शंकर) साळुंखे यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गणपत (शंकर) साळुंखे यांचे दुःखद निधन

नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी 

श्रीगोंदा : येथील ज्येष्ठ नागरिक, बागायदार आणि सामाजिक कार्यकर्ते कै. गणपत उर्फ शंकर साळुंखे (वय ८५) यांचे श्रीगोंदा येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने श्रीगोंदा शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

कै. साळुंखे हे गेली अनेक वर्षे सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेत होते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीकडे लक्ष केंद्रित करून प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली होती. शांत, मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे आणि आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते.

 

वारकरी परंपरेशी त्यांचा घट्ट संबंध होता. ते दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करत असत आणि धार्मिक कार्यात सदैव सहभागी होत.

 

ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव साळुंखे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

कै. साळुंखे यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक व कृषी क्षेत्रात कार्य करणारा एक प्रेमळ व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें