श्रीगोंदा तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे संदीप आल्हाट यांचा सत्कार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीगोंदा तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे संदीप आल्हाट यांचा सत्कार

नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी.

श्रीगोंदा : पदविकाधर पशुवैद्यक संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी श्री. संदीप आल्हाट यांची निवड झाल्यानंतर श्रीगोंदा तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सहकाऱ्यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. गोरख सातकर, विस्तार अधिकारी डॉ. श्रीधर गादेवार, श्री. प्रशांत गवई, श्रीम. दिपाली मानमोडे, श्रीम. सुजाता सरकटे, श्रीम. आश्विनी गायकवाड, श्री. मिलिंद पंडीत, श्री. अमोल रसाळ, श्री. मनोज बनकर तसेच कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.

 

सत्कार प्रसंगी उपस्थितांनी श्री. आल्हाट यांच्या कार्याचा गौरव करत पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वातून अधिक प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]